शिराढोण येथे खेत बचाओ अभियान
पिकांचे संरक्षण आणि शाश्वत शेती पद्धतींबद्दल शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी च्या वतीने शिराढोण गावात 'खेत बचाओ' अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत कृषि विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. माधुरी रेवणवार आणि कृषी विस्तार शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण चव्हाण यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
अभियानाची मुख्य वैशिष्ट्ये : तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना जैविक निविष्ठांचा वापर, खतांचा संतुलित वापर आणि हिरवळीच्या खतांबद्दल सविस्तर माहिती दिली. जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी माती परीक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. रासायनिक कीटकनाशकांवरील अवलंबित्व कमी करून उत्पादन खर्च कमी करण्याचे आवाहन करण्यात आले. #KhetBachaoAbhiyaan #खेतबचाओअभियान #ICAR #DKMA #BalancedFertilization #KBA #SustainableAgriculture #शाश्वतशेती #मातीपरीक्षण #कीडव्यवस्थापन #शिराढोण

0 Comments