जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा: मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
शेतीमध्ये शाश्वत प्रगती साधायची असेल, तर केवळ पारंपरिक पद्धतींवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मा. श्री राहुल कर्डिले (जिल्हाधिकारी, नांदेड) यांनी केले. लालवंडी येथील प्रक्षेत्रावर आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जमिनीतील कडक थर फुटून पाण्याची साठवणूक वाढवण्यासाठी 'सबसॉइलर' सारखी यंत्रे आणि पिकांच्या अवशेषांचे जागीच खत करण्यासाठी 'मोबाईल श्रेडर'चा वापर केल्यास जमिनीचा पोत निश्चितपणे सुधारेल.
- डॉ. प्रियांका खोले यांनी ५० हून अधिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सबसॉइलर आणि मोबाईल श्रेडरचे प्रत्यक्ष सादरीकरण केले.
- हवामान दक्षता: 'एल निनो' संकटाचा सामना करण्यासाठी कृषी उपाययोजनांबाबत प्रबोधन करण्यात आले. जमीन आरोग्य: संतुलित खत वापर आणि मृद व जलसंधारणाच्या पद्धतींची माहिती देण्यात आली.
प्रमुख उपस्थिती: मा. श्री राहुल कर्डिले (जिल्हाधिकारी, नांदेड), मा. श्री प्रमोद देशमुख (चेअरमन, संस्कृती संवर्धन मंडळ), श्री प्रकाश जोंधळे (सरपंच, लालवंडी), श्री दत्त कुमार कळसाईत (ASO), श्री गिते (SDAO), श्री दिपेश देवरे (TAO), डॉ. माधुरी रेवणवार, डॉ. प्रियांका खोले, श्री. सर्जेराव ढवळे, श्री. व्यंकट शिंदे, श्री. संतोष तेलंगे, श्री. संदीप पुयड, श्री. शिवम गायकवाड, श्री. दिनेश शिंदे, श्री. नारायण मोरे व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 Comments