‘खेती बचाओ अभियान’ बाळापूर येथे संतुलित खत वापर आणि 'एल निनो' विषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न!

 ‘खेती बचाओ अभियान’ बाळापूर येथे संतुलित खत वापर आणि 'एल निनो' विषयी जनजागृती कार्यक्रम संपन्न!




🌱
​'शेती वाचवा अभियाना'अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, राज्य कृषी विभाग आणि 'आत्मा' (ATMA) यांच्या संयुक्त विद्यमाने धर्माबाद तालुक्यातील बाळापूर येथे एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मार्गदर्शन: ​जमीन आरोग्य व खत व्यवस्थापन: केव्हीकेचे विषय तज्ज्ञ डॉ. प्रवीण चव्हाण यांनी माती परीक्षणावर आधारित खतांच्या वापराचे महत्त्व पटवून दिले. रासायनिक खतांचा अतिवापर टाळून नॅनो युरिया आणि सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले.
​हवामान व पाणी व्यवस्थापन डॉ. निहाल मुल्ला यांनी आगामी पावसाळ्यावर होणाऱ्या 'एल निनो'च्या संभाव्य परिणामांबद्दल मार्गदर्शन केले. कमी कालावधीत येणाऱ्या पिकांची निवड, आकस्मिक पीक नियोजन आणि पाण्याचा कार्यक्षम वापर याविषयी त्यांनी तंत्रज्ञान समजावून सांगितले.
​यावेळी कृषी विभागाचे अधिकारी, 'आत्मा'चे प्रतिनिधी आणि परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments