गाढव संवर्धन आणि कल्याण विषयावर अकोल्यात विशेष चर्चासत्र संपन्न!
पशुवैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (MAFSU), नागपूर यांच्या वतीने गाढवपालक आणि पशुपालकांसाठी आयोजित करण्यात आलेली "गाढव संवर्धन आणि भटके पशुपालक" ही एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली.
या कार्यक्रमात आयोजित पॅनल चर्चासत्रात पशुसंवर्धन, ग्रामीण उपजीविका आणि वन्यजीव संरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
प्रमुख उपस्थिती व सहभाग: - धर्मा डाँकी सॅंक्च्युरी (DDS): श्री. अभिजीत महाजन यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली, तर श्री. माधव ताटे यांनी गाढव कल्याण क्षेत्रात काम करताना येणारे अनुभव व आव्हाने मांडली. - डॉ. निहाल मुल्ला: कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मागील २ वर्षांत राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यात 'सुदृढ आणि सुंदर गाढव स्पर्धा', अश्वमित्रांचे प्रशिक्षण, 'ग्लँडर्स' रोग जनजागृती आणि पशु आरोग्य शिबिरांचा समावेश होता.
आमच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे, विशेषतः सुदृढ गाढव स्पर्धेचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
या कार्याची दखल घेत माननीय कुलगुरू महोदय यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
पशुपालक आणि गाढव संवर्धनासाठी आम्ही असेच अविरत कार्य करत राहू.
#पशुसंवर्धन #गाढवसंवर्धन #MAFSU #अकोला #पशुवैद्यकीयमहाविद्यालय #पशुपालक #कृषीविज्ञानकेंद्र #गाढवकल्याण #GlandersAwareness #DonkeyConservation #VeterinaryScience #महाराष्ट्र #kvksagroli #animals #animalcare



0 Comments