कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी द्वारे कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भरता योजनेअंतर्गत समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक आयोजन

कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी द्वारे कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भरता योजनेअंतर्गत समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक आयोजन


कडधान्य पीक उत्पादनात देशाला आत्मनिर्भर बनविण्याच्या अनुषंगाने कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भरता योजनेअंतर्गत कृषि विज्ञान केंद्र सगरोळी मार्फत बिलोली तालुक्यातील लोहगाव, हरनाळी आणि बेळकोणी (खु.) तसेच देगलूर तालुक्यातील थडी सावरगाव आणि मंडगी या गावात प्रति शेतकरी एक एकर याप्रमाणे २५० शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर तुर पिकाचे एकात्मिक पीक व्यवस्थापन प्रात्यक्षिक राबवण्यात आले. डॉ. कृष्णा अंभुरे यांनी तुर पिकातील एकात्मिक पीक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना सुधारित वाणांचा वापर, बीज प्रक्रियेचे महत्त्व, खतांचे योग्य व्यवस्थापन तसेच तण व्यवस्थापन ई. बाबत सखोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमानंतर शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान केले आणि प्रात्यक्षिकांसाठी आवश्यक सुधारित वाण (गोदावरी) आणि बीजप्रक्रियेसाठी ट्रायकोडर्मा आणि जैविक खतांचे वाटप केले.
#agriculture #farming #AtmanirbharBharat #कडधान्यआत्मनिर्भरता #तूरपीकव्यवस्थापन #गोदावरीवाण #शेतकरी #आधुनिकशेती #नांदेडकृषी #KVKSagroli #Agriculture #PulsesProduction



Post a Comment

0 Comments