खेत बचाव अभियान: हवामान बदलत्या संकटात नांदेडच्या शेतकऱ्यांना 'हवामान-स्मार्ट' शेतीचे धडे!
'खेती बचाव अभियानांतर्गत' कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने धनोरा ता. उमरी, जि. नांदेड येथे शेतकरी जनजागृती कार्यक्रम. बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सक्षम करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. डॉ. संतोष चौहान, डॉ. प्रियांका खोले आणि श्री. यदुराज अंजेवार मंडळ कृषी अधिकारी, उमरी यांनी एल-निनोचा शेतीवरील परिणाम, कमी कालावधीच्या वाणांची निवड, पीक नियोजन आणि बीजप्रक्रियेचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. 'पाणी अडवा-पाणी जिरवा' या संकल्पनेवर भर देत बीबीएफ (Broad Bed and Furrow) व बेड टोकण पद्धत, सघन कापूस लागवड आणि मृदा व जलसंवर्धन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. तसेच पारंपरिक पिकांना उत्तम पर्याय म्हणून फळबाग लागवडीचे महत्त्व पटवून देण्यात आले. फळबागांमुळे जमिनीची सुपीकता टिकते, पाणी जिरण्यास मदत होते आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन व शाश्वत उत्पन्न मिळते. उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी कृषी शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन केले आणि भविष्यात 'हवामान-स्मार्ट' शेती पद्धतीचा अवलंब करण्याचा संकल्प केला. #खेतबचावअभियान #हवामानस्मार्टशेती #फळबागलागवड #नांदेडशेतकरी #शाश्वतशेती #मृदाजलसंधारण #उमरी #शेतकरीजागृती #ModernFarming #NandedFarmers #कृषीविज्ञानकेंद्र #KVKSagroli #ICAR Icaratari Pune Indian Council of Agricultural Research



0 Comments