खेती बचाओ अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रम

खेती बचाओ अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रम


खेती बचाओ अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रम. विज्ञान केंद्र, सगरोळी यांनी आत्मा (ATMA), महाराष्ट्र यांच्या सहकार्याने खेती बचाओ अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील जामगाव येथे शेतकरी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले.

या कार्यक्रमात डॉ. कृष्णा आंभुरे (विषय विशेषज्ञ – पीक संरक्षण) व डॉ. प्रियांका खोले (विषय विशेषज्ञ – कृषी अभियांत्रिकी) यांनी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य व्यवस्थापन, बीज प्रक्रिया, नैसर्गिक शेतीतील निविष्ठा, हवामान अनुकूल शेती, मृदा व जलसंधारण, पीक अवशेष व्यवस्थापन, सुधारित शेती पद्धती, एल-निनोचा शेतीवरील परिणाम तसेच विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास श्री. अनिल जाधव (उपविभागीय कृषी अधिकारी), श्री. जागेवार (मंडळ कृषी अधिकारी), श्री. मिरासे (कृषी अधिकारी, उमरी) तसेच कृषी विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांना विविध शासकीय कल्याणकारी योजना व कृषी विकास कार्यक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमात एकूण ४८ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला व तज्ज्ञांशी सक्रिय संवाद साधला. #खेतीबचाओअभियान #कृषी_विभाग #agriculture #ElNino #kvksagroli

Post a Comment

0 Comments