खेती बचयो अभियान – बाऱ्हाळी ता. मुखेड
अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी, नांदेड आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बाऱ्हाळी येथे मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावर्षी शेतीवर होणारा 'एल निनो' (El Niño) चा संभाव्य परिणाम आणि त्यावर करायच्या उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
केव्हीके सगरोळीच्या डॉ. माधुरी रेवणवार आणि डॉ. प्रियंका खोले यांनी हवामान-अनुकूल शेती पद्धतींविषयी सविस्तर माहिती दिली. वैज्ञानिक बीजप्रक्रिया, बीबीएफ (BBF - रुंद वरंबा सरी) पद्धतीने पेरणी आणि जमिनीची सुपीकता वाढवण्याच्या नैसर्गिक पद्धतींवर विशेष भर देण्यात आला.
यावेळी मुखेडचे तालुका कृषी अधिकारी श्री. बोधमवाड, मंडळ कृषी अधिकारी आणि कृषी विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकांचे तज्ज्ञांनी योग्य निरसन केले.


0 Comments