खेती बचाव अभियान कार्यक्रमाचे आयोजन मौजे हुंडुंडा, ता. बिलोली
कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या वतीने व आत्मा (ATMA), कृषि विभाग यांच्या सहकार्याने मौजे हुंडुंडा, ता. बिलोली, जि. नांदेड येथे खेती बचाव अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये डॉ. प्रियांका खोले, विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी), डॉ. कृष्णा आंभुरे, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) तसेच कृषी विभागाचे श्री. कांबळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना हवामान अनुकूल शेती, मृदा व जलसंधारण उपाययोजना, पीक अवशेष व्यवस्थापन, सुधारित वाणांची निवड, बीजप्रक्रिया, एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM), संतुलित खत व्यवस्थापन तसेच शाश्वत शेती पद्धती याविषयी मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी वैज्ञानिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे महत्त्व त्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले. तसेच शेतीची उत्पादकता व शाश्वतता वाढविण्यासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास एकूण 25 शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी तज्ज्ञांशी संवाद साधून शंकांचे निरसन करून घेतले. #खेतीबचावअभियान #कार्यक्रम #agriculture #कृषी_विभाग #शेतीवाचवाअभियान #ElNino


0 Comments