खेत बचाव अभियानांतर्गत मरखेल येथे किसान गोष्टी कार्यक्रम
ताा. देगलूर येथील मरखेल गावात कृषी विभागाच्या सहकार्याने "खेत बचाव" अभियानांतर्गत किसान गोष्टी आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमास ३२ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी रासायनिक खतांचा संतुलित व कार्यक्षम वापर, रासायनिक खतांना पर्याय, नैसर्गिक खतांचा वापर, तसेच एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर पीक नियोजन व आपत्कालीन उपाययोजना विषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रतिकूल हवामान परिस्थितीत पशुधनाचे नुकसान टाळण्यासाठी पशुसंवर्धन क्षेत्रातील योग्य उपाययोजनांची माहिती देण्यात आली. या गोष्ठीमुळे शेतकऱ्यांना शाश्वत व हवामान बदलास अनुकूल शेती पद्धतीबाबत विविध विषयांची माहिती मिळाली. #Agriculture #ElNino #खेतीबचाओअभियान #kvksagroli #खेतबचाव #खेतबचावअभियान #खेतीबचावअभियान #कृषी_विभाग


0 Comments