कृषि विज्ञान केंद्र, सगरोळीच्या संपर्क शेतकरी श्री. केदार शिंदे यांचा गौरवपूर्ण सन्मान!
श्री. केदार शिंदे यांनी देशी गोवंशातील लाल कंधारी गायीच्या संवर्धनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, त्यांना महाराष्ट्र राज्याचे मा. कृषिमंत्री श्री. दत्तामामा भरणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शुद्ध देशी गोवंशाचे जतन व संवर्धन दिनानिमित्त आयोजित या भव्य कार्यक्रमात महाराष्ट्र शासनातील मान्यवर मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रातील मान्यवर आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला. लाल कंधारी या मौल्यवान देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी श्री. केदार शिंदे यांचे योगदान निश्चितच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे देशी गोवंश संवर्धनाच्या चळवळीला नवी दिशा आणि बळ मिळत आहे. या गौरवाबद्दल श्री. केदार शिंदे यांचे संस्थाप्रमुख श्री. प्रमोद देशमुख, श्री. रोहित देशमुख, कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी आणि संपूर्ण संस्था परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 


“देशी गोवंशाचे संवर्धन — शेतकऱ्यांच्या समृद्धीचे साधन!” #agriculture #farming #animals #award #farmer #kvksagroli #लाल_कंधारी #कृषिमंत्री #गायीच्या_संवर्धन



0 Comments