खरीप पिकातील कीड व रोग व्यवस्थापन आणि फळपिक लागवड संदर्भात शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम...

 खरीप पिकातील कीड व रोग व्यवस्थापन आणि फळपिक लागवड संदर्भात शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम...


मोजे खपराळा ता बिलोली येथे कृषि विभाग बिलोली व कृषि विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमानाने खरीप पिकातील कीड व रोग व्यवस्थापन आणि फळपिक लागवड संदर्भात शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला होता. या कार्यक्रमामध्ये कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील शास्त्रज्ञ डॉ. कृष्णा अंबुरे यांनी सोयाबीन, कापूस व तुर पिकातील एकात्मिक व्यवस्थापन या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले तसेच डॉ. संतोष चव्हाण यांनी कोरडवाहू फळ पिक लागवड व व्यवस्थापन या बद्दल मार्गदर्शन केले.तालुका कृषी अधिकारी बिलोली, पवार साहेब यांनी कृषी विभागातील विविध योजना या बद्दल माहिती दिली. #Kharif #crop #kvksagroli #nanded #agriculture #farmers #farming #vegetables #fruits #insects
#diseasemanagement






Post a Comment

0 Comments