जैविक शेती व्याख्यान

जैविक शेती व्याख्यान


🌱
✨

कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथे 'खरीप हंगाम: पूर्वमशागतीपासून ते उत्पादनापर्यंतचे जैविक व्यवस्थापन' या विषयावर आयोजित व्याख्यान उत्साहात पार पडले. प्रसिद्ध जैविक शेती तज्ज्ञ श्री. नितीन तळेकर, नाशिक यांनी शेतकऱ्यांना जमिनीचा पोत सुधारण्यापासून ते दर्जेदार उत्पादनापर्यंतचे सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या १५ वर्षांच्या अनुभवातून मिळालेल्या या उपयुक्त टिप्समुळे खरीप हंगामात जैविक पद्धतीने शेती करण्यासाठी उपस्थित शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री. दिलीप कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभली. रिलायन्स फाउंडेशन आणि कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा उपक्रम शेतकऱ्यांच्या शाश्वत प्रगतीसाठी महत्त्वाचा पाऊल ठरला आहे. स्वयंपूर्ण आणि सक्षम गावाकडे वाटचाल.
🙏🌾





Post a Comment

0 Comments