दापशेड येथे 'दशपर्णी अर्क' निर्मिती प्रात्यक्षिक व शेतकरी कार्यशाळा संपन्न!
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर लोहा तालुक्यातील दापशेड येथे 'आर्या नैसर्गिक शेतकरी गट' आणि 'कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी' यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय विशेष शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती, जमिनीची सुपीकता आणि प्रत्यक्ष 'दशपर्णी अर्क' कसा तयार करावा याचे लाईव्ह प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
श्री. राजाभाऊ कदम (पाणी फाउंडेशन): जैविक निविष्ठांचा (Bio-inputs) वापर करून शेतीचा खर्च कमी करण्याचे तंत्र सांगितले. सौ. रामदिनलवार मॅडम (सहायक कृषी अधिकारी): एकत्र येऊन 'गटशेती' करण्याचे फायदे आणि शेतावर जैविक उत्पादने तयार करण्याविषयी मार्गदर्शन केले.


0 Comments