हाळदा येथे 'खेत बचाओ अभियान’ जनजागृती कार्यक्रम
कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कंधार तालुक्यातील हाळदा येथे 'खेत बचाओ अभियान' जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि हवामान बदलात शेती टिकवणे हा यामागील मुख्य उद्देश होता.
डॉ. संतोष चव्हाण, डॉ. निहाल मुल्ला यांनी शेतकऱ्यांना फळबाग लागवड, पीक विविधीकरण, बीजप्रक्रिया, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि खतांचा संतुलित वापर व हवामान-अनुकूल शेती, पशुधन व्यवस्थापन आणि मृद-जलसंधारण मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी पीक व्यवस्थापन, जमिनीचे आरोग्य, कीड-रोग नियंत्रण आणि शाश्वत उत्पन्नाच्या स्रोतांबाबत तज्ज्ञांशी थेट संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. #खेत_बचाओ_अभियान #कृषीविज्ञानकेंद्र #सगरोळी #कृषीविभाग #आत्मानांदेड #हवामानअनुकूलशेती #कंधार #फळबागलागवड #पशुपालन #शेतीसल्ला #शाश्वतशेती #शेतकरी


0 Comments