समूह/गट स्थापनेतून शेतकऱ्यांचे बळकटीकरण या विषयावर चिंचाळा येथे प्रशिक्षण
तालुका कृषि अधिकारी श्री. विवेक गुडूप यांनी कृषि विभागाच्या विविध योजना, अनुदान व समूह नोंदणी प्रक्रियेबाबत माहिती दिली. श्री. माधव तरकंटे यांनी एफपीओच्या माध्यमातून मिळणारे बाजारपेठेचे फायदे, प्रक्रिया व मूल्यवृद्धी याबत मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना सहभागी होण्यास प्रोत्साहित केले. या कार्यक्रमाला अमृतलायम शेतकरी उत्पादक कंपनीचे श्री. माधव तरकंटे, कृषि विभागाचे मंडळ अधिकारी श्री. गिरी, मध्य प्रदेशचे उद्योजक श्री.अवनीशजी आणि कृषि विज्ञान केंद्राचे प्रक्षेत्र व्यवस्थापक श्री. रवी मिद्दलवार व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाला चिंचाळा व परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. #agriculture #farming #FPO #FPC #farmer #group #शेतकरी_उत्पादक_कंपनी #कृषि_विभाग #एफपीओ #योजना #अनुदान #kvksagroli

0 Comments