रामपूर येथे ‘खेत बचाओ अभियान’ जनजागृती कार्यक्रम
रामपूर येथे कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी आत्मा व कृषि विभाग देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात केव्हीकेचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण चव्हाण, तालुका कृषी अधिकारी श्री. कावडवाड, उपकृषी अधिकारी बोडके तसेच आत्माचे श्री. अचमारे यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व, सेंद्रिय निविष्ठांचा वापर, रासायनिक खतांचा संतुलित वापर, धरती माता बचाओ, अल निनो विषयी प्रभावी उपाययोजना आणि शासकीय योजनांचा लाभ याबाबत सविस्तर माहिती दिली. या संवादामुळे शेतकऱ्यांमध्ये शेतीचे संरक्षण व शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याची नवी प्रेरणा निर्माण झाली. #खेतीबचावअभियान #कृषीविज्ञानकेंद्र #केव्हीकेसगरोळी #आत्मानांदेड #हवामानअनुकूलशेती #संतुलितखतवापर #शाश्वतशेती #नांदेडशेतकरी #ATMA #KVKSagroli #ClimateResilientAgriculture #SustainableFarming #ICAR Icaratari Pune Indian Council of Agricultural Research

0 Comments